कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय मधुकर शेवाळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२:– नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुली चे जेष्ठ शिक्षक संजय मधुकर शेवाळे याना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्कार 2024 नुकताच जाहीर करण्यात आला. रविवारी 3 मार्च रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.शेवाळे यांची पुरस्कारासाठी निवड करताना राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आविष्कार फाउंडेशनने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेतली. पुरस्कारप्राप्त शेवाळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेवाळे सर इन्सुली येथील प्रशालेत गेली 23 वर्षे विज्ञानशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या विषयाचा दहावीचा निकाल मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाचा शंभर टक्के लागतो.विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी काही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर इंस्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती मिळवून दिली. राज्यस्तरीय विज्ञान मेळावा(२०१७), राज्यस्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव (२०२३) व अलीकडेच पार पडलेल्या राज्यस्तरीय वैज्ञानिक प्रदर्शनचे आयोजक म्हणून त्यांनी यशस्वी नियोजन केले होते. सीमाभागातील निपाणी जि. बेळगाव येथे वेळोवेळी परिवर्तनवादी मराठी साहित्य संमेलन घेत असताना सरांचा सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व समतावादी चळवळीत सक्रिय सहभाग सरांचा राहिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये एक आदर्श विज्ञान शिक्षक म्हणून सरांची ओळख असून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने इन्सुली ग्रामस्थ,विद्या विकास मंडळ इन्सुलीच्या पदाधिकारी,माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून अभिनंदन होत आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी विशेष कौतुक केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!