न्यायालय कोनशिला कार्यक्रम पत्रिकेत राऊत-नाईकांना डावलले !
*🛑न्यायालय कोनशिला कार्यक्रम पत्रिकेत राऊत-नाईकांना डावलले !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२१*:-दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभाच्या पत्रिकेत कार्यक्रम शिवसेनेचे (ठाकरे गट) स्थानिक खासदार विनायक राऊत व कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांना डावलण्यात आले आहे. जाणून- बुजून हा दुजाभाव केला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत शिवसेनेतर्फे आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयानजी क न्यायालयासाठी असलेल्या नियोजित जागेत ही इमारत होणार आहे. कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली आहे. हा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच न्यायमूर्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राऊत व नाईक या दोघांनाही कार्यक्रम पत्रिकेत डावलण्यात आले आहे, हे योग्य नाही, असे बोभाटे यांनी सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

