अतिक्रमणाविरोधात वृद्धेचे बेमुदत उपोषण
*🛑अतिक्रमणाविरोधात वृद्धेचे बेमुदत उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२१*:-सासोली येथील सामायिक जमिनीच्या मालकी क्षेत्रातील काजूबागेत काही धनदांडग्यांनी अतिक्रमण करून काजूझाडे तोडली आहेत. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तक्रार करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी दोडामार्ग तहसीलदारांकडे केली होती. मात्र, त्यांनी कार्यवाही न केल्याने मंगळवारी ७५ वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी कृष्णा पिळणकर यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. सासोली येथील वडिलोपार्जित असलेल्या काजूच्या बागेत रुक्मिणी पिळणकर यांची वडिलोपार्जित काजू बागायत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण होते. मात्र, काही धनदांडग्यांनी १०० वर्षापूर्वीची या बागायतीत अतिक्रमण करून काजूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काजू झाडे तोडल्याने रुक्मिणी पिळणकर यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने कुटुंब देशोधडीला लागले आहे.त्यामुळे अतिक्रमण करून आर्थिक नुकसान करणाऱ्या संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी ७५ वर्षीय वृद्धा रुक्मिणी पिळणकर यांनी तहसीलदारांकडे केली होती. कार्यवाही न केल्यास मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. तहसीलदारांनी कार्यवाही न केल्याने रुक्मिणी पिळणकर यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. यावर तोडगा काढण्यात महसूल प्रशासनास यश आले नाही.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

