कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यावर अपप्रवृत्ती वाढीस !

*🛑निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यावर अपप्रवृत्ती वाढीस !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०*:-हिंदुत्वाचे विचार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे महायुतीत सामील होऊ शकतात, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयात पुन्हा एकदा अपप्रवृत्ती वाढीस लागत आहे. आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभा निवडणूक लढवणार आहे, हे जाहीर केल्यानंतर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेली काही मंडळी जाणीवपूर्वक आपल्याविरोधात अपप्रचार करीत आहेत. ही प्रवृत्ती उद्या पदावर आल्यास काय करतील, हे लोकांनी समजावे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कुठल्याही परिस्थितीत उद्या, मंगळवारी तुम्ही सर्व ठेकेदारांना बोलावून बैठक घ्या आणि रस्त्याची कामे ते का करीत नाहीत, हे पहा. रत्नागिरीत कामे होतात, मग इथे का होत नाहीत? सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातच येतो ना? असा सवालही त्यांनी केला वेंगुर्ले तालुक्यात केसरकर यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर केसरकर म्हणाले, जिल्हयात पुन्हा एकदा अपप्रवृत्ती वाढत आहे ही अपप्रवृत्ती कोण आहे, हे याची मला कल्पना आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि मला लोकसभा लढवण्यास कुणी आग्रही करू शकत नाही. मी विधानसभा निवडणूक लढवणार, हे जेव्हा जाहीर केलं, तेव्हा अशा अपप्रवृत्ती वाढल्या आहेत. मी या विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी या मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. माझ्या विरोधात हेतुपुरस्सर अपप्रचार करणाऱ्या अपप्रवृत्तीला लोकांनी धडा शिकवायला हवा. ही अपप्रवृत्ती ठेकेदारांना येथे त्रास देत आहे. जर उद्या ही मंडळी पदावर आली, तर काय करतील हे जनतेने लक्षात घेऊन त्यांना येथून हद्दपार करायला हवे, असेही ते म्हणाले. पर्यटन विकासाचा निधी तेव्हाच्या पर्यटनमंत्र्यांनी खर्च केला नाही. त्यांचे कान धरणार का, असा सवाल त्यांनी केला. माजी आमदार उपरकर हे सत्तेतील पक्षात येतील असे त्यांनी म्हंटले आहे यावर केसरकर म्हणाले ते आमच्या पक्षात येत आहेत की नाहीत याची मला कल्पना नसून मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या बाबत निर्णय घेतील.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!