मराठी भाषा संवर्धन पुरस्कार डॉ. प्रकाश परब यांना जाहीर
*🛑मराठी भाषा संवर्धन पुरस्कार डॉ. प्रकाश परब यांना जाहीर*
*🛑महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार जाहीर : डॉ. परब यांची अनेक पुस्तके प्रकाशित*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२०*:-महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे अभ्यासक असणाऱ्या व या भाषेचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पुरस्कारासाठी सन २०२३ साठी निवड केली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारी, मराठी भाषा, आपली संस्कृती व त्याचे संवर्धन संगोपन व संरक्षण करण्याच्या हेतूने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. सिंधुदुर्ग-कुडाळचे सुपुत्र डॉ. प्रकाश परब यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.डॉ. अशोक रा. केळकर यांच्या नावे मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तर कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावे मराठी भाषा संवर्धन विषय पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉ. अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक व्यक्ती पुरस्कार डॉ. प्रकाश परब (कुडाळ, डोंबिवली) यांना तर संस्थेचा पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ (बेळगाव) यांना, तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कौतिकराव ठाले-पाटील व संस्थेचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानला (नाशिक) जाहीर झाला आहे. डॉ. प्रकाश परब हे कुडाळचे सुपुत्र असून डोंबिवली व कुडाळ येथे त्यांचे वास्तव्य आहे. मुंबई मुलुंड येथील वझे-केळकर महाविद्यालयाचे ते मराठी विषयाचे प्रमुख होते. मराठी समाज भाषा विज्ञान व व्याकरण या विषयावर त्यांचे प्रभूत्व आहे. शासनाचे व अन्य अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची मराठी भाषाविषयक अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे ‘मराठी भाषा : समाज व शासन’ हे आगामी पुस्तक प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

