प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे मानवाचा प्राथमिक हक्क !
*🛑प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे मानवाचा प्राथमिक हक्क !*
*🛑आनंदोत्सव कार्यक्रमात जलजीवन मिशन कार्यशाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१९*:-प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे हा मानवाचा प्राथमिक हक्क आहे. पाणी हेच आपले खरे जीवन आहे. म्हणून पाण्याचे योग्य संवर्धन व वापर होणे गरजेचे आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करावा व त्याचे संवर्धन करावे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी आनंदोत्सवात केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ओरोस येथे होत असलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी राठोड, द्वितीय क्रमांक मिळविलेले परुळे बाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अधिकारी प्रवीण काणकेकर व संतोष पाटील यांचाही गौरव करण्यात आला. भरडधान्य पाककला स्पर्धेचे उद्घाटन विनायक ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. भरडधान्य पाककला स्पर्धेत २५ महिलांनी भाग घेतला होता. जलजीवन मिशन योजनेची सविस्तर माहिती निवृत्त कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. कार्यक्रमाला उद्योजक किरण सामंत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख बाळकृष्ण गावडे, भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत-भोसले, सुमेधा तावडे, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, यशवंत पंडित, सुनील देसाई, प्रगतशील शेतकरी प्रतिभा नाईक भालेकर व प्राध्यापक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

