कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन बनले कोडगे !

*🛑सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन बनले कोडगे !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९*:-सिंधुदुर्गनगरी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील जेल रोड परिसरात अतिक्रमण झाले आहे, असे मान्य करूनही आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. म्हणजे सावंतवाडी नगरपरिषदेची महाकोडगेगिरी असल्याचा आरोप सावंतवाडी- बाहेरचावाडा येथील पुरुषोत्तम देवराम केनवडेकर यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा तक्रार करून आपल्याला न्याय मिळण्याबरोबरच सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील जेल परिसरातील सिटी सर्व्हे क्रमांक ४७, ५१ या जमीन मिळकतीत अतिक्रमण करून बेकादेशीर विनापरवाना चिरे बांधकाम केले आहे. हे बांधकाम बेकायदेशीर आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने ते मान्यहीकेलेले आहे. मात्र, सदर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली जात नसल्याने तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश सावंतवाडी नगरपालिकेला दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही.
*जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे!*
दरम्यान, अतिक्रमण झालेले आहे हे मान्य असूनसुद्धा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही कार्यवाही केली जात नसल्याने सावंतवाडी नगर परिषदेची महाकोडगेगिरी सुरू आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन ते अतिक्रमण काढण्याचे आदेश पुन्हा द्यावेत व आदेशाचे पालन न केल्याबद्दल सावंतवाडी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केनवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!