कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

असलदेत तीन मंदिरांच्या फंडपेट्या चोरट्यांनी फोडल्या

*🟥 असलदेत तीन मंदिरांच्या फंडपेट्या चोरट्यांनी फोडल्या*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.१०*:-असलदे गावातील तीन मंदिरांच्या फंडपेट्या चोरट्यांनी फोडल्या. या घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. तिन्ही ठिकाणच्या फंडपेट्यांमधील मिळून जवळपास १० हजार रुपये चोरीस गेले आहेत.असलदे गावातील उगवतीवाडी येथील गणेशमंदिर, मधलीवाडी येथील माऊलीदेवी मंदिर, डामरेवाडी येथील साईबाबा मंदिर अशा तीन मंदिरांच्या फंडपेट्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. फंडपेट्या कोणत्यातरी हत्याराने उचकटून फोडत चोरट्यांनी आतील रक्कम लंपास केली. घटनेची माहिती समजताच असलदेतील ग्रामस्थ तिन्ही ठिकाणी दाखल झाले होते. हवालदार चंद्रकांत झोरे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, असलदे ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्री १.४५ वा. सुमारास एक चोरटा दिसून आला आहे. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटू शकली नव्हती. तर पोलीस घटनास्थळी जाऊन आले तरीही घडल्या प्रकाराची कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नव्हती. ग्रामस्थांकडून तक्रार देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, असलदे येथेच शुक्रवारी दुपारच्या सुमारास बीएसएनएलचे उभे असलेले पोल चोरण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला. परिसरात शेतीकाम करत असलेल्या काही ग्रामस्थांना याची चाहूल लागताच त्यांनी धाव घेत चोरट्यांना पकडले. तिन्ही चोरटे परप्रांतिय असून ते नांदगाव येथे एका ठेकेदाराकडे कामाला असल्याचे निष्पन्न झाले. याचवेळी या मार्गाने जात असलेल्या एलसीबीच्या पथकाने चोरट्यांना ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. मात्र, या प्रकाराचीही कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नव्हती.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!