🟥 व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर, दि-१०:- राजापूर तालुक्यातील पाचल-ताम्हाणे रस्त्यावर व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सहायक वनरक्षक संरक्षक चिपळूण परिक्षेत्र, वनाधिकारी रत्नागिरी यांनी इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत सापळा लावून मारुती सुझुकी कंपनीची बलेनो क्र. MH.46CH3995 अडवली. सदरच्या गाडीची तपासणी करीत असता आरोपी नं.१) राजकुमार सुरेश शेलार वय वर्ष ३३, २) आकाश राजेंद्र घाडगे वय वर्ष २९, आणि ३) रुपेश गणपत म्हात्रे वय वर्ष ३९ यांनी व्हेल माश्याच्या उलटी सहित गाडीची तपासणी करणारे कर्मचारी श्री. साबणे याना उडवून गाडी घेऊन पळून गेले. सदरची गाडी आरोपी यांनी नेर्ले मार्गे गगनबावडा-भुईबावडा दिशेने वेगाने नेली. त्यावेळी गाडीच्या बाहेर असणारा आरोपी राजकुमार सुरेश शेलार याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गगनबावडा पोलीस स्टेशनला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे नाकाबंदी करुन सदरील मारुती सुझुकी कंपनीची बलेनो गाडी क्र. MH46CH3995 अडवून वरील आरोपी यांना ताब्यात घेतले. व त्याची वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) याना कल्पना दिली . आरोपी यांची पूर्ण चौकशी करून तसेच वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील चौकशी कामी परीक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी यांच्या ताब्यात दिले. सदर प्रकरणी वनपाल राजापूर यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार प्र. गु. र. क्र. ०१/२०२४ दि. ०४/०२/२०२४ अन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपींना १६ फेब्रुवारी पर्यंत न्यायालय कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई विभागिय अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वनरक्षक रत्नागिरी ( चिपळूण) वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्थ कर्मचारी वनपाल सदानंद घाडगे, रामदास खोत व दिलीप आरेकर तसेच वनरक्षक अरुण माळी, सहयोग कराडे, प्रभू साबणे, विक्रम कुंभार, महिला कर्मचारी श्रवणी पवार, सिद्धेश्वर गायकवाड, वाहनचालक अंकूश तांबट, रेस्क्यू टीम राजापूरचे विजय म्हादये, नितेश गुरव यांच्या समवेत पूर्ण केली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा संकटांत सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास त्याबाबत तात्काळ माहिती देण्याकरिता वनविभागाचा टोल फ्री क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

