कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हा स्काऊट- गाईड मेळाव्यात जि.प.पू. प्राथ.शाळा आंबेगाव नं.1चे उल्लेखनीय यश

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०९:- बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे दि. 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्काऊट- गाईड,कब-बुलबुल मेळाव्यात सहभागी होत जि.प.पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1 ने सर्वाधिक 7 चषकांची कमाई करत उल्लेखनीय यश प्राप्त केले.

शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकाने मातीकाम स्पर्धेत-प्रथम क्रमांक, गाठीच्या स्पर्धेत -प्रथम क्रमांक, शेकोटी कार्यक्रमात-तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या पथकात कु.ओंकार कुंभार,सदाशिव दळवी, रोहन झोरे, प्रणव दळवी, गणेश कोकरे,अजय जंगले,तनिश गावडे,भावार्थ झोरे, प्रविण जंगले,साईराज गावडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

तसेच शाळेच्या शिवरत्न संभाजी कब पथकाने गाठीच्या स्पर्धेत-प्रथम क्रमांक, शेकोटी कार्यक्रम-द्वितीय क्रमांक, मातीकाम स्पर्धेत-तृतीय क्रमांक, बडी सलामी स्पर्धेत-तृतीय क्रमांक प्राप्त केला.या पथकामध्ये कु. समित कुंभार, विकास शेळके, नितेश जाधव, संग्राम मेस्त्री, गौरव गावडे,दीपराज झोरे, गौरव दळवी, पुष्कर कविटकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

शाळेच्या या दोन्ही पथकांनी 7 चषकांची कमाई करत प्रशंसनीय यश प्राप्त केले.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर श्री.नितीन सावंत,मुख्याध्यापिका श्रीम. अस्मिता मुननकर,श्री.प्रदीप म्हाडगुत,श्रीम.रसिका नाईक, श्रीम.स्नेहल कांबळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या जिल्हास्तरीय यशाबद्दल सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महादेव देसाई,आंबेगावचे सरपंच श्री. शिवाजी परब, उपसरपंच श्री.रमेश गावडे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अस्मिता मुननकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.साक्षी राऊळ, उपाध्यक्षा श्रीम. तेजस्वी गावडे, शिक्षण तज्ज्ञ श्री. राहुल राणे,श्रीम. रेखा गावडे,श्री.अशोक शिंदे, श्री.संतोष राणे तसेच सर्व पालक, सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

जि.प.पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1 ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्शवत शाळा असून ही शाळा सातत्याने विविध स्पर्धा तसेच उपक्रमांमध्ये सातत्याने यश संपादन करीत आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!