सिंधुदुर्गात दोन हजार कोटीची विविध कामे प्रस्तावित
*🟥सिंधुदुर्गात दोन हजार कोटीची विविध कामे प्रस्तावित*
*🟥महावितरणची माहिती : नवीन उपकेंद्रे, रोहित्रांची उभारणी, भूमिगत वाहिन्या आदी कामे होणार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०९*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनरुत्थान वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरण व विद्युत वाहिन्या भूमिगतीकरणाची १ हजार ९८२ कोटी ८४ लक्ष रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यात ११ नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रे, ६ अतिरिक्त उपकेंद्र रोहित्रांची उभारणी, नवीन वितरण रोहित्रे, नवीन उच्च व लघुदाब वाहिनी, विद्युत खांब व रोहित्र पेट्या बदलणे, फिडर विलगीकरण, स्मार्ट मीटरिंग, उपरी विद्युत वाहिन्या भूमिगत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.जिल्ह्यात आरडीएसएस योजनेतून ११७४ कोटी ९४ लक्ष निधीतून विद्युत यंत्रणेच्या बळकटिकरण व विस्तारीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. कुडाळ एमआयडीसी, पणदूर, पावशी, आंब्रड, वाफोली, निरवडे, वेंगुर्ले, वझरे, घोटणे, शिरगाव, तळेरे कासर्डे या ११ ठिकाणी ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्रे होणार आहेत. आडेली, सागरतीर्थ, कोनाळकट्टा, सासोली, आंबोली, सांगवे या ३३/११ केव्ही उपकेंद्रात नवीन अतिरिक्त रोहित्र बसविण्याची कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात ४९९ वितरण रोहित्रे, ३७४ वितरण रोहित्रांची क्षमता वृद्धी, ७३५ किलोमीटर नवीन विद्युत वाहिनी होणार असून त्यात ५३६ कि.मी. उच्च व १९९ कि.मी. लघुदाब वाहिनी, ३९४४ जीर्ण विद्युत खांब व १२३४ नादुरुस्त रोहित्र पेट्या बदलणे अशी कामे प्रस्तावित आहेत. १६ कृषी फिडरचे विलगीकरण, वीजहानी कमी करण्यासाठी एरियल बंच केबल टाकणे, उच्चदाब विद्युत वाहिनीत सुधारणा, वाहिन्यांचे भूमिगतीकरण इ. कामे प्रस्तावित आहेत. तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातून ५०० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महावितरणला वितरित करण्यात आला. यातून देवगड (१०६.२८ कोटी), मालवण (९४.९७ कोटी), आचरा (९१.८१ कोटी), वेंगुर्ला (९६.८९ कोटी) व कुडाळ (१०९.८८ कोटी) या भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम करण्यात येणार आहे. वेंगुर्ले, देवगड, मालवणसाठी विद्युत यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ३०२ कोटी ९१ लक्ष रुपयांचा विद्युत कामांचा प्रकल्प आराखडा मंजूर आहे. चिपी विमानतळ येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित आहे. देवगड, मालवण, आचरा, वेंगुर्ले व कुडाळ या भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम करण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

