कलंबिस्त हायस्कूल येथे १० रोजी महाआरोग्य शिबीर
*🟥कलंबिस्त हायस्कूल येथे १० रोजी महाआरोग्य शिबीर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०८*:-कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था अणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १० फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात नेत्रचिकित्सक, सर्जन, स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ आदी डॉक्टर तपासणी करणार आहेत. आयुष्मान कार्डही काढले जाणार आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची तपासणी केली जाणार आहे. हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आदी सर्व तपासण्याही केल्या जाणार आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या पंचक्रोशीत प्रथमच महाआरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. आठ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस आदी जिल्हा रुग्णालयाचा स्टाफ असणार आहे. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिगंबर करंबळेकर व सर्जन डॉ. श्याम राणे, नेत्रचिकित्सक चेतन कोरे, केतन कदम, स्वाती रावले, संदीप मोहाड, संगीता कोरे, संतोष देसाई, तृप्ती जाधव, नेहा पडते, श्रद्धा सावंत, प्रियंका राऊत, प्रशांत जाधव, दशरथ गोसावी तपासणी करणार आहेत. गरजूंनी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहवे. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार आहे. या उद्घाटनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कलंबिस्त संस्थेचे पदाधिकारी, गावातील प्रमुख ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते व दुग्ध संस्थेचे चेअरमन अॅड. संतोष सावंत व सचिव रमेश सावंत यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

