🟥 पोलीस पाटील गुणदानावर संभ्रम वाढला
🟥 ना प्रश्न चुकीचे ना उत्तरे तरीही गुणदान, फेर परीक्षेवर पांघरूण घालण्यासाठी चुकीची पद्धत ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा आरोप
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०५:- सावंतवाडी उपविभागासाठी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील भरतीबाबत आता निकालानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १६ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरंतर प्रश्न किंवा पर्यायी उत्तर चुकीचे असल्यावर गुण देण्यास हरकत नाही मात्र ते ही एक ते दोन समजू शकतात मात्र ८० पैकी १६ देणे म्हणजे परीक्षा पद्धत चुकीची असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आपल्याकडे आलेआहे. जर १६ गुण देण्यात आले तर लेखी परीक्षेला अर्थ काय ? महत्वाचे म्हणजे ही गुण पद्धत चुकीची असून फेर परीक्षा घ्यावी किंवा लेखीचे गुण गृहीत न धरता लेखीमध्ये पात्र हाच निकष ठेवावा अशी मागणी शिवसेना (उ. बा. ठा. )उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली. प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत श्री. धुरी यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खरं तर सुरुवातीपासूनच पोलीस पाटील भरतीने साशंकता निर्माण केली होती. आणि तब्बल १६ गुण देऊन यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केल. परीक्षा ही ८० गुणांची होती आणि त्यापैकी १६ गुण देणे याचा अर्थ सरळ सरळ परीक्षा पद्धत चुकीची ठरली त्यामुळे फेर परीक्षा हाच पहिला पर्याय आहे. बहुपर्यायी उत्तरामध्ये शक्यतो उत्तर रिकामी ठेवले जात नाही ज्याने अंदाजे उत्तरे लिहिलीत त्यांनाही गुण मिळू शकतात त्यामुळे त्यांना अधिक १६ गुण मिळाल्याने ज्याने त्या १६ पैकी बरोबर उत्तरे लिहिलीत त्यावर हा अन्याय आहे. १६ गुण द्यावे लागणे हे स्पर्धा परीक्षेत उचित आणि शोभनीय नाही त्यामुळे तुम्हाला पारदर्शीपणा सिद्ध करायचा असल्यास फेर परीक्षा घ्यावी
*(अन्यथा हाही पर्याय…!)*
ज्याअर्थी १६ गुण देण्यात आले त्याअर्थी लेखी परीक्षा गुण ग्राह्य धरू नये. पात्र की अपात्र हा निकष डोळ्यासमोर ठेऊन तोंडी परीक्षा व्हावी. सदर उमेदवारामधून योग्य चाचपणी होऊन गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याची काळजी घ्यावी अन्यथा या परीक्षा पद्धतीने गावात तणाव वाढीस लागण्याची भीती आहे असेही धुरी म्हणाले
*(उमेदवारांना, मानसिक त्रासातुन बाहेर काढा )*
श्री. धुरी म्हणाले, ज्याअर्थी १६ गुण अधिक दिलेत त्या अर्थी आपण कठीण प्रश्न होते हे मान्य करता. त्यावेळी उमेदवारांची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा. ते प्रश्न वाचल्यावर उमेदवार भांबावले असा याचा अर्थ आहे त्यामुळे अंदाजपंचे उत्तरे लिहावी लागली. हे परीक्षा दृष्टीने योग्य नाही.
*(प्रश्नही बरोबर उत्तरपर्यायही बरोबर मग गुण देता येतात का?)*
काठीण्य पातळी म्हणून गुण देणे कितपत योग्य आहे. अशी पद्धत नसते जर प्रश्न टायपिंग मिस्टेक किंवा खालील उत्तर चुकीचे असेल तर ठिक पण हा निर्णय केवळ पात्र करण्यासाठी घेतला असे असेल तर गुण ग्राह्य न धरता पात्र हाच निकष ठेवावा अशी आपली मागणी असल्याचे धुरी यांनी सांगितले. नेहमी योग्य त्या बाजूने राहिलो आहोत जर बाबत आपण तातडीने लक्ष घालून समाधान केले नाही तर आपण आंदोलन उभारणार याचीही नोंद घ्यावी
*(संभ्रमग्रस्त विद्यार्थ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन )*
काही ठिकाणी विजयी जल्लोष सुरु आहेत मात्र मुलाखतही महत्वाची आहे. परिक्षार्थींना जे वाढीव १६ गुण देण्यात आलेत, याबाबत संभ्रम असल्याच्या काही तक्रारी आपल्याकडे आल्यात. मात्र सर्वच विद्यार्थी पोहचू शकत नाहीत. सावंतवाडी उपविभागातील तिन्ही तालुक्यात जर असे संभ्रमित विद्यार्थी असतील तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. धुरी यांनी केले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

