कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

महिलेला ९० हजाराचा ऑनलाईन गंडा

*🟥महिलेला ९० हजाराचा ऑनलाईन गंडा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०५*:-‘ऑनलाईन’ पद्धतीने महिलेच्या खात्यातील तब्बल ९० हजार ९ रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. २७ डिसेंबरला सकाळी १०.३० वा. सुमारास घडलेल्या या घटनेबाबत फसवणूक झालेल्या पूनम प्रकाश कदम (२८, मूळ बोर्डवे बौद्धवाडी व सध्या रा. घाटकोपर – मुंबई) यांनी रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, पूनम यांच्या भावाचा अपघात झाला असून त्याच्या ऑपरेशनसाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी गावी आलेल्या पूनम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी त्यांना मेसेज करून ‘गुगल पे’वर रक्कम पाठविल्याचेही सांगितले. २७ डिसेंबरला पूनम यांनी ‘गुगल पे’ तपासले असता त्यांच्या खात्यात रक्कम झालेली दिसली नाही. त्यांनी ‘गुगल पे कस्टमर केअर’लाही कॉल केला, मात्र तो कॉल लागला नाही. याचवेळी त्यांना एक फोन आला. ‘टूकॉलर’वर ‘कस्टमर केअर’ असे दिसल्याने त्यांनी कॉल उचलला व आपल्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याचे सांगितले. पलिकडून बोलणाऱ्याने पूनम यांना एक ‘अॅप डाऊनलोड’ करायला सांगितले. त्यानंतर पूनम यांचे खाते असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एक अॅप उघडायला सांगितले. त्याद्वारे भामट्याने ओटीपी नंबर मागून घेतला. थोड्या वेळाने पूनम यांनी पाहिले असता त्यांच्या खात्यातून आधी ७० हजार २२३ रुपये व नंतर २० हजार ७८६ रुपये कमी झाल्याचे आढळले. थोड्या वेळाने त्यांना आणखी एका नंबरवरून फोन आला. अन्य खातेनंबर सांगा. तुमची तुमची रक्कम परत करतो, असे पलिकडून बोलणाऱ्याने सांगितले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मुंबई गाठल्यानंतर खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधला. बँकेच्या सुचनेनुसार त्यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!