🟥 “देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’च्या घोषणा देत होते तेव्हा टरबूज होते, आता पार.”, उद्धव ठाकरेंचा टोला
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०४:– आज सावंतवाडी या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी कोकणवासीयांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका केली. देशात पाशवी बहुमताचं सरकार नको आहे.त्यापेक्षा आपलं इंडिया आघाडीचं मिलीजुली असलेलं सरकार चालेल. आम्हीही २५ ते ३० वर्षे तुमच्या बरोबर होतो. आम्हाला काहीतरी चांगलं होईल वाटलं होतं. पण तसं काही झालंच नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी टरबूज असा केला आणि पुन्हा येईनच्या घोषणेवरुन त्यांना टोला लगावला आहे.
का म्हणाले उद्धव ठाकरे?
“मोदींनी सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा संपवून टाकला. कारण नसताना विरोधी पक्षाला संपवायला निघाले आहेत. बाजारबुणगे, गद्दार, भेकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली आहेत. या भेकडांची फौज घेऊन माझ्यावर चाल करत आहात? तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीत विचारला. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईनच्या घोषणेवरही कडाडून टीका केली.
देवेंद्र फडणवीस आधी टरबूज होते आता..
“देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. ते आता पाव उमुख्यमंत्री झाला आहात. पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या घोषणा करताना टरबूज आणि आता झालेत चिराट. तरीही तुम्ही फोडाफोडीचे धंदे करत आहात. मी आजारी होतो, हालचाल करु शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळरात्रीच्या करामती केल्या त्यात तुमचा पक्ष संपलाय. माझी शिवसेना वाढली आणि फोफावली आहे. जिथे जातो आहे तिथे लोक येत आहेत. मुस्लीम लोकही रायगड दौऱ्यात बरोबर आले होते. यांचं हिंदुत्व वेगळं हे धर्मा-धर्मांमध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाही हे त्यांनाही कळलं आहे. आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे. तुमचं हिंदुत्व हे आगी लावणारं आहे.” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.
माझी ताकद माझ्यासमोर बसलेली जनता आहे
मी संवाद दौरा सुरु केला आहे तो आपल्या लढ्यासाठी. मी ही लढाई तुमच्या भरवशावर लढतो आहे. अजूनही भाजपाला कळत नाही या उद्धव ठाकरेचा पक्ष फोडला, चोरला, धनुष्य-बाण चोरला. तरीही हा उभा कसा? कारण माझं कवच तुम्ही सगळी जनता आहात. हे माझं घराणेशाहीचं वडिलोपार्जित कवच आहे आणि मी घराणेशाहीची वारसा घेऊनच पुढे जातोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत असे कितीही गद्दार आले तरीही त्यांना तुम्ही चिराटासारखं फोडून टाकाल याची मला खात्री आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

