🟥 न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ
🟥 येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधकांना घेराव घालू ; संदेश सावंत
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-३१:- मागील काही दिवासांपासून न्हावेली सोनुर्ली आरोस पंचक्रोशीत बीएसएनएलच्या ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे येथील जनतेचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील बीएसएनएल अधिकाऱ्यांचा यावर दुर्लक्ष होत आहे. या बाबतच्या तक्रारी आज न्हावेली रेवटेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक संदेश सावंत यांच्याकडे रहिवाशानी केल्या असून त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास न्हावेली आरोस सोनुर्ली गावातील ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नू यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा विभाग समन्वयक श्री सावंत म्हणाले. पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी व बीएसएनएल ग्राहकांचे हाल होत आहेत. आजही कित्येक युवक वर्क फ्रॉम होम करीत आहेत तर पुढे काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थी वर्गाचे मोठ नुकसान होत असून याची जबाबदारी बीएसएनएल आपल्या डोक्यावर घेणार की रिचार्जच्या माध्यमातून फक्त पैसाच गोळा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
तरी येत्या दोन दिवसात सेवा सुधारा अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास तयार रहा असा इशारा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री सावंत यांनी जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नु यांना दिला आहे.
तर जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याशी संपर्क साधला असता आज त्या ठिकाणी टेक्निकल टीम दाखल होणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

