कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

पिंगुळीत राऊळ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

*🟥पिंगुळीत राऊळ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ*

*🟥धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय : जिल्ह्यासह गोवा, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव भागातील भाविकांची उपस्थिती*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.३०*:-योगीयांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांच्या ३९ व्या पुण्यतिथी उत्सवाला सोमवारपासून भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.या उत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी राऊळ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू होता. सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा, आजरा- कोल्हापूर, बेळगाव व अन्य भागातील राऊळ महाराजांचे भक्त समाधी मठात दाखल होत आहेत. त्यामुळे पिंगुळीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज पहाटे ५.३० वाजता राऊळ महाराज यांच्या समाधीस्थळी नित्य काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला.राऊळ महाराज समाधीस्थानात विधीवत पूजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता शतचंडी यागाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा करून अनुष्ठानास सुरुवात करण्यात आली. दुपारी राऊळ महाराजांची महाआरती, त्यानंतर दुपारी १ ते ३ पर्यंत असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सायंकाळी नित्य सांजआरती झाल्यानंतर सुनील पाडगावकर यांचा ‘हवा नवा तो सुर’ हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला. राऊळ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामुळे राऊळ महाराजांचे हे रुप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या महोत्सवानिमित्त मठाच्या परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाधी मंदिरसह परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पिंगुळी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हा उत्सव ३१ जानेवारीपर्यंत बंध चालणार असून बुधवार हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!