पत्रकार क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज
*🟥पत्रकार क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज*
*🟥उद्या पोलीस परेड मैदानावर रंगणार स्पर्धा : जिल्ह्यातील पत्रकारांचा सहभाग*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.३०*:-सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. ३१ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने जय्यत तयारी सुरू केली असून विजेत्या संघास ७७७७ रुपये, उपविजेत्या संघाला ५५५५ रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर लावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यालय पत्रकार संघातर्फे सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर ३१ जानेवारीला जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुका आणि एक. मुख्यालय असे एकूण नऊ क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.या स्पर्धेच्या अंतिम नियोजनासाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची बैठक अध्यक्ष संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात झाली. यावेळी सचिव लवू म्हाडेश्वर, खजिनदार गिरीश परब यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, विनोद परब, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आठही तालुका पत्रकार संघांनी आपली नोंदणी केली आहे. मुख्य बक्षिसांव्यतिरिक्त उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर यांची निवड करून त्यांना चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या उद्घाटन, समारोपासह स्पर्धेदरम्यान भेट देणाऱ्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

