केदारलिंग विकास कार्यकारी सोसायटी करूळ येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ
प्रतिनिधी – संजय शेळके
वैभववाडी – केदारलिंग विकास कार्यकारी सोसायटी करूळ येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावात भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
भारत खरेदी केंद्र शुभारंभप्रसंगी माजी पं. स. सदस्य बाळा कदम, सरपंच सरिता कदम, व्हा. चेअरमन रवींद्र पवार, माजी उपसरपंच शरद सावंत, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र गुरव, रामचंद्र शिवगण, संध्या गुरव, अनिता सुतार, मनीषा राऊत, तसेच बबन डकरे, सुभाष पाटील, हिराचंद कोलते, दाजी कोलते, दीपक लाड, सुरेश कोलते, उदय सावांत, प्रदीप कोलते, बँक व्यवस्थापक श्री. पालकर, गटसचिव रामकृष्ण कोलते, अनंत कोलते, परशुराम शिंगरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या शेतीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनच्या सोयीसाठी तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड होऊ नये यासाठीच हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा फायदा गावातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन दिगंबर पाटील यांनी केले आहे.