कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

ओटवणेचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक

*🟥ओटवणेचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे,दि.२६*:-ओटवणे (सावंतवाडी) गावचे सुपुत्र तथा मुंबईतील कांदिवलीचे पोलीस उपनिरीक्षक ‘प्रकाश महादेव परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. गावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने ओटवणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात येते. त्यानुसार प्रकाश परब यांच्या आजपर्यंतच्या गौरवशाली सेवेची दखल घेऊन त्यांना हें पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई विभागात १९८८ मध्ये प्रकाश परब दाखल झाले. या दरम्यान त्यांनी दादर, चुनाभट्टी, यलोगेट, कुर्ला, बोरिवली, गोरेगाव, एमएचबी या पोलीस ठाण्यात सेवा बजावली. उपनिरीक्षक परब सध्या कांदिवली पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. परब यांना त्यांच्या ३६ वर्षातील उत्कृष्ट, प्रामाणिक व उल्लेखनीय निःस्वार्थी सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. प्रकाश परब यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचे वडील महादेव परब यांनीही पोलीस खात्यात हवालदार म्हणून सेवा बजावली होती. त्यांचाच वारसा पुढे चालवत प्रकाश परब मुंबई पोलीस दलात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. ओटवणे गावच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. ओटवणे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!