महाराष्ट्रमुंबईसामाजिक

🟥 ‘मनोज जरांगेंनी थांबावे, तोडगा निघेल.’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२५:- निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करत आहे. १ लाख ४० हजार जणांची टीम मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहे. त्याचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर होईल.त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. त्यामुळे जरांगे यांना कालही केले तसे आजही मी आवाहन करतो की, त्यांनी आंदोलन करू नये, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाजबांधव मुंबईकडे आगेकूच करत आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात व मोर्चा विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे कोर्टाने देखील जरांगे यांना नोटीस बजावली आहे. परिणामी राज्यात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाला टीकणारे आरक्षण व न्यायालयाच्या चौकटीत बसेल असे आरक्षण दिले जाईल. इतर कुणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्या दृष्टीने आरक्षणासाठी सरकार काम करत आहे. जर सरकार सकारात्मक नसते तर आंदोलन, मोर्चा काढणे साहजिकच बरोबर आहे. परंतू आत्ता मोर्चा काढण्याची गरज नाही. कारण सरकारच्या वतीने पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने काम केले जात आहे.

 

 

मराठा युवकांना ओबीसींच्या सुविधा

मराठा समाजातील मुलांना ओबीसींना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा दिल्या जात आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलांना सर्वसुविधा दिल्या जात आहेत. दुसरे म्हणजे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतः एमपीएससीतील पाचशे मुलांचा प्रश्न सोडवला. तर १७०० पेक्षा अधिक मराठा समाजातील मुलांच्या अधिसंख्य पदे भरली. त्यासाठी सातत्याने काम सुरू आहे, असेही शिंदेंनी पुढे म्हटले.

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!