कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

सावंतवाडी शहरात हिंदू धर्मीयांचा ‘ एल्गार ‘ : भव्य मोर्चा

*🟥सावंतवाडी शहरात हिंदू धर्मीयांचा ‘ एल्गार ‘ : भव्य मोर्चा*

*🟥संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करा : प्राचार्यांना निवेदन*

*🟥अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा : मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२४*:-वादग्रस्त पोस्ट प्रकरणाला बुधवारी सावंतवाडी वेगळे वळण लागले असून शेकडोंच्या संख्येने हिंदू धर्मीय एकवटले आहेत. सोशल मिडियावर हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणाऱ्या त्या युवकासह ती शेअर करणाऱ्या संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनीवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली.
तसेच महाविद्यालयातून हे सर्व हिंदू धर्मीय रॅलीने शहरातून नगरपालिकेच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी हिंदू धर्मिय मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महिलांचाही मोठा सहभाग होता. नगरपालिकेत आल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत शहरातील अनधिकृत परप्रांतिय फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच फेरीवाले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. ही कारवाई करताना स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घ्या असेही यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सुचविले.
अनधिकृत फेरीवाल्यांची यापूर्वी यादी तयार करण्यात आली या यादीप्रमाणे करा,अशी मागणी यावेळी संजू परब यांनी केली. सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना व्यायाम शाळेतील प्रशिक्षक त्वरित बदला अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी नगरपालिका आवारात हिंदू धर्मियांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. यानंतर हा मोर्चा सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे वळला तिथे पोलिसांनाही निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली,माजी नगराध्यक्ष संजू परब, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे,माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे,, संजू शिरोडकर,निशांत तोरस्कर, दिलीप भालेकर, बंटी जामदार, केतन आजगांवकर , किशोर चिटणीस, प्रतिक बांदेकर, रुपेश कावले, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, हेमंत बांदेकर, राजू केळुस्कर, अमित भराडी, प्रतिक नाईक, सुमित वाडकर, अजित सांगेलकर, सुधाकर राणे, विनोद सावंत, विनोद राऊळ, परेश बांवकर, सुकन्या टोपले, विशाखा रांगणेकर, गौरी राऊळ, मंजिरी धोपेश्वरकर, गायत्री देवस्थळी, अंजली नातू यांसह शेकडो हिंदू धर्मीय उपस्थित होते

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!