कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कोकण इतिहास परिषद १३ वे राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्षपदी डॉ. वि. ल. धारूरकर

*🟥कोकण इतिहास परिषद १३ वे राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्षपदी डॉ. वि. ल. धारूरकर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२३*:-येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोकण इतिहास परिषदेच्या १३व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि.ल.धारूरकर यांची निवड झाली आहे.वेरूळ येथील जैन लेण्या आणि मूर्ती विज्ञान, दक्षिण भारतातील सिंधू संस्कृतीचे अवशेष, जैन धर्म, दायमाबाद येथील प्राचीन संस्कृतीचा शोध अशा विविध ऐतिहासिक विषयावरील त्यांचे संशोधन जगभरात प्रसिद्ध आहे.
काही काळ इतिहासाचे प्राध्यापक, अभ्यासक व नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे वृत्तपत्र विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.अलीकडेच त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्य केले आहे.१९७६ ते १९८० या काळात भारतीय पुरातत्व विभागात कार्यरत छत्रपती संभाजी नगर येथील बीबी का मकबरा यावर सखोल संशोधन केले.तसेच धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यात भारतीय सिंधू संस्कृतीचे अवशेष शोधून काढण्याचे बहुमोल काम त्यांनी केले. तर नगर जिल्ह्यातही याच काळातल्या उत्खननात सिंधू संस्कृतीतील ब्राँझ रथ त्यांना आढळला होता.डॉ.वि.ल.धारूरकर १९७५ ते ८५ अशी सलग दहा वर्षे जैन धर्मावर संशोधन करीत होते. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, चीन, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशात त्यांच्या संशोधन कर्याची दखल घेतली जाते.डॉ.वि.ल. धारूरकर यांच्या रूपाने एक अभ्यासू विचारवंत या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी लाभले असून या वेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्यवाह डॉ. विद्या प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*२८ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत*
परिषदेत सहभागी होण्यासाठी अभ्यासक व प्राध्यापकांनी प्राचीन ,मध्ययुगीन व आधुनिक या विभागातील आपले शोध निबंध २८ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, परिषद समन्वयक डॉ. सोमनाथ कदम, डॉ.बाळकृष्ण गावडे, डॉ. राजेंद्र मुंबरकर डॉ.मारोती चव्हाण, प्रा. सचिन दर्पे व डॉ. तेजस जयकर यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!