कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

चौपदरीकरानंतर कसाल मध्ये बीएसएनएलची सेवा अजूनही कोमात..

▪️कसाल दशक्रोशीतील दोन दिवस बीएसएनएल नेटवर्क गायब..

▪️कसाल मधील बीएसएनएलचे कार्यालयच बंद..

▪️नेट नसल्याने ग्राहकांना धान्य वेळेत मिळत नाही; ग्राहकांना मारावे लागतात  हेलपाटे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.२१: येथील बीएसएनएल लैंण्डलाईन सेवेचा बोजवारा उडाला आहे. बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणची लँडलाईन सेवा ठप्प असून बीएसएनएलच्या या कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर चौपदरीकरण काम पूर्ण होत आले तरी ठप्प झालेली बीएसएनएलची लँण्डलाईन सेवा अद्याप कोमात आहे. बीएसएनएल लैंण्डलाईन सेवा म्हणजे ग्रामीण भागाचा सर्वात प्रथम भाषेच्या माध्यमातून जगातील तोडणारी यंत्रणा अशी ओळख होती. सुरुवातीला अगदी खेडोपाडी लँण्डलाईन सेवा कार्यरत झाल्यानंतर टपाल विभागामार्फत प्रगत शहरांशी जोडले गेलेली गावे अगदी काही मिनिटांत जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही सहज संवाद साधत होती. त्यापुढील टप्प्यात मोबाईलने तर ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ चुटकी में सिद्ध केले. ऐकेकाळी सर्वसामान्य जनतेशी लैण्डलाईन ठरलेली बीएसएनएल लैंण्डलाईन सेवा आता ऑफलाईन गेली आहे. आता ग्रामीण भागात नेट केव्हाच गायब झाले आहे. अनेक गावातील बीएसएनएलच्या लाईन तुटून गेल्या आहेत. तर रस्त्याकडेला दिसणारे  पोल हे आता गायब झाले आहेत. ग्रामीण भागातून गायब झालेल्या बीएसएनएलच्या सेवेनंतर आता शहरी भागातही या सेवेला अखेरची घरघर लागली आहे. कसाल बसस्थानक ग्रामीण रुग्णालय, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायती हे सर्व सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित असलेली ठिकाणे आहेत. अनेकांना बसची चौकशी करणे व इतर अनेक महत्वाच्या कामांसाठी फोन करावे लागत असतात. तर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंंद्र बँका या तर अतिशय महत्त्वाचे स्थान आहेत. मात्र, या ठिकाणी आता फोन लागत नाही. अनेक ठिकाणी लँण्डलाईन वर फोन केल्यावर ‘ये नंबर सेव्ह मे नही है, ये नंबर इस समय काम नही कर रहा है’ अशा प्रकारच्या सूचना फोन वर आता ऐकायला मिळत आहेत. ऑनलाइनची जागा आता मोबाईलने घेतली असली तरी या महत्त्वाच्या ठिकाणी तरी सेवा अत्यावश्यक आहे. या ठिकाणची ही सेवा बंद झाली तर लोकांनी फोन कुठे करायचा असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.

महामार्ग चौपदरीकरण कामाला सुरुवात केल्यानंतर बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली होती. एक एक करून असे अनेक लँडलाईन बंद पडले. मात्र, याची कोणीच दखल घेत नाही. एकेकाळी लँडलाईन ठरलेली ही सेवा आता ऑफलाईन झाली आहे. कोणत्या तांत्रिक कारणांमुळे लैण्डलाईन सेवा सुरू करणे कठीण होत असले तर किमान बसस्थानक, आरोग्य केंद्र, सेतु सुविधा, ग्रामपंचायती, बँका ठराविक नंबर कार्यरत करावेत. जेणेकरून या ठिकाणी दूरध्वनी नसल्याने सर्व सामान्यांची होणारी गैरसोय दूर होईल. मात्र, सुस्त झालेल्या बीएसएनएल’च्या लँण्डलाईन सेवेबरोबर यावर कोणाचाच आता वचक राहिलेला नाही.  मात्र, गेले वर्ष दोन वर्षे बंद असलेले या सेवेबाबत ना संबंधी विभाग दखल घेत, ना  लोकप्रतिनिधी! यामुळे आता बीएसएनएल लैण्डलाईन सेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असेच काहीसे  सर्वसामान्य मधून बोलले जात आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!