गवाणकर कॉलेजमध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळा
*🟥गवाणकर कॉलेजमध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२२*:-सुंदर हस्ताक्षराचे संस्कार बालवयापासून झाले पाहिजेत, असे उद्गार सावंतवाडी येथील गवाणकर कॉलेजमध्ये शिक्षकांच्या हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे उद्घाटन करताना, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे यांनी काढले. मुलांच्या हस्ताक्षराकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणून शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी पंचायत समिती सावंतवाडी व देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज सावंतवाडी यांनी सहकार्य केले होते. यावेळी व्यासपीठावर आंगणे यांच्यासोबत केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गटशिक्षणाधिकारी सौ.कल्पना बोडके, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, कमलाकर ठाकुर, म. ल. देसाई, सर्व शिक्षा अभियान कार्यालय प्रमुख महेंद्र चव्हाण, मार्गदर्शक विकास गोवेकर व संयोजक भरत गावडे होते. राजन पोकळे, कल्पना बोडके, रामचंद्र वालावलकर, शंकर प्रभू यशोधन गवस आदींनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे मार्गदर्शक विकास गोवेकर यांनी अल्पावधीत मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी नेमके काय करावे, याचे स्वानुभवांवर आधारित सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमोद सावंत (बांदा) यांनी आभार मानले.सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. या प्रशिक्षणानंतर सुमारे ५५ प्राथमिक शाळांत हा हस्ताक्षर सुधार कार्यक्रम राबविला जाणार आहे. तद्नंतर शिक्षकांची उपक्रम अहवाल लेखन स्पर्धा व विद्यार्थ्यांची हस्ताक्षर लेखन स्पर्धा स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील यशस्वितांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

