चराठे-पंचशीलनगर येथील रस्ताप्रश्नी उपोषणाचा इशारा
*🟥चराठे-पंचशीलनगर येथील रस्ताप्रश्नी उपोषणाचा इशारा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२०*:-चराठे-पंचशीलनगर येथील रस्ताप्रश्नी पंचायत समिती माजी सदस्य विश्राम कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव, ग्रामपंचायत माजी सदस्य मीनाक्षी जाधव यांच्यासह २६ जानेवारीला उपोषणाला बसणार आहेत.यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात, चराठे पंचशीलनगर पूर्वीचे हरिजनवाडीवरील रहिवासी असून आमच्या बाडीवर पूर्वीपासून वाडीवर ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता असून त्याची नोंद ग्रामपंचायत गाव नमुना २६ मध्ये सन १९७१ पासून आहे. आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी आजही आमच्या वाडीवर वाहने ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. वाडीवर ये-जा करण्यासाठी एक पाणंद आहे. पण त्यावरून चारचाकी अथवा मोठी वाहने येऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत वाडीवर एखादी दुर्घटना घडली अथवा एखादी व्यक्ती अत्यवस्थ झाल्यास अॅम्बुलन्स अथवा अग्निशमन दलाची गाडी येऊ शकत नाही. रस्ता पक्का बनविण्यासाठी आम्ही वारंवार विनंत्या, अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. विद्यमान सरपंच आणि विद्यमान ग्रामसेवक यांचे आडमुठे धोरण, मनमानी कारभार आणि अनास्थेमुळे १९७१ पासून रस्ता नोंद असूनही ग्रामपंचायत प्रशासन हा रस्ता पक्का बनविण्यास टाळाटाळ करत आहे. आजही आमच्या वाडीवर चारचाकी वाहने ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मागास समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी चराठे ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. उपोषणाची दखल घ्यावी आणि समस्त मागास समाजावर होणारा अन्याय दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

