कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 साळगावकरांच्या विरोधात ‘प्लॅन’ रचणाऱ्यांची सखोल चौकशी करावी..

🟥 माजी नगरसेवक व मित्रमंडळाची मागणी ; पोलिस निरीक्षक अधिकारी यांना दिले निवेदन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१७:- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवल्याने हल्ला करण्यासाठी रचलेल्या प्लॅनबाबत सखोल चौकशी करुन संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवकांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सावंतवाडी ते आंबोली घाटमार्ग रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी तक्रार करून त्यासंदर्भात चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर सबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्व. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला करुन दुखापत करण्याबाबत एकत्रित जमून प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. सावंतवाडी येथील एक ठेकेदार यांच्या प्लांटवर सुमारे १० दिवसांपूर्वी जेवणावळ करुन त्या ठिकाणी प्राणघातक हल्ल्याचा कट शिजविण्यात आला असून माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर याच्यावर हल्ला करण्याबा- बत प्रत्येकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये काही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी या कार्यालयाचा एक अधिकारी यांनी हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्लान तयार केला. सखोल चौकशी करुन संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवकांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमाकांत वारंग, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुधीर पराडकर, विद्याधर गावडे आदी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!