🟥 ठाणे जिल्ह्यात कार्यक्रमांद्वारे रामाचा जप ; शिवसेना, भाजप आणि संस्थांकडून कार्यक्रमांचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ठाणे, दि-१७:- आयोध्येत २२ जानेवारीली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात राम कथा,पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तलाव परिसरात महाआरती, व्याख्यान, रामाच्या जीवन प्रवासावर आधारित लेझर शो, अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आठवडाभर रामाचा जप होणार आहे. तसेच विविध संस्थांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे.
आयोध्येत २२ जानेवारीली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात रामाचा जागर सुरू झाला असून ठाणे जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. ठाणे शहरातील राम मंदीराची प्रतिकृती असलेला रथ गृहसंकुले तसेच परिसरात नेऊन नागरिकांना अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. या रथाद्वारे घोडबंदर भागातील १८० गृहसंकुलांमधील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना अक्षता वाटप करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे, घोडबंदर तसेच विविध भागात राम कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. ठाण्यात २० ते २२ जानेवारी या काळावधीत रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजप प्रवक्ते सुजय पतकी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर करून रामाच्या जीवनप्रवासावर आधारीत रांगोळ्या या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. या महोत्सवात ५०० वर्षांचा मंदिराचा प्रवास चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. तसेच कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

