कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सासोली येथे सुरु असलेल्या द ओरिजिन कंपनी गुडगाव येथील प्रकल्पात कामास असलेल्या परप्रांतीयांवर गुन्हे दाखल करा..

🟥 सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार व त्यांच्या शिष्टमंडळाची उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे मागणी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१५:- दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे उभारत असलेल्या द ओरिजिन कंपनी गुडगाव येथील प्रकल्पात कामास असलेल्या परप्रांतीयांवर आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये गुन्हे दाखल करण्याचीं मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार वं त्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे केली याबाबतचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल त्यात महसूल ने ही लक्ष घालावे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

दोन दिवसापूर्वी सासोली येथे द ओरिजिन कंपनी रा.गुडगाव या हरयाणा राज्यामधून काही परप्रांतीय कामगार सासोली येथे कपंनीत आले होते.सदरील कामगार सासोली येथील स्थानिकांच्या सामायिक जमिनीत घुसून बेकायदा शिरकाव केला. असे निदर्शनास आले.द ओरिजिन या कंपनीचे कामगार हे परराज्यातून आले आहेत असे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे त्यामुळे त्यांच्यावर आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये गुन्हे दाखल केले जावेत. या परप्रांतीय कंपनीने आपल्या कंपनीची तसेच कामगारांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करणे क्रमप्राप्त होते परंतु त्यांनी नोंद केली नसल्यामुळे कंपनीचे मालक, संचालक मंडळ गंभीर गुन्ह्यास पात्र आहेत. हे परप्रांतीय कामगार किती दिवसापासून दोडामार्ग तालुक्यात वास्तव्यास आहेत? कोणत्या कारणासाठी ते येथे आले आहेत?किती दिवस ते राहणार आहेत ? आधारकार्ड तपासणी झाली आहे का ? त्याची नोंद दोडामार्ग पोलिस ठाण्यात झाली आहे का असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत त्यामुळे जर त्यांच्या नोंदी नसतील तर या कंपनीवर,परप्रांतीय कामगारांवर आंतरराज्य स्थलांतरित कायद्यान्वये गुन्हे पोलिसांनी दाखल करावेत.

याप्रश्नई आम्ही सामाजिक कार्यकर्ते स्थानिक लोक ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम आहोत.दुसर्‍या राज्यातून येवून दादागिरी करत असतील तर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत ही आमची मागणी आहे. गेली अनेक वर्षे आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये परप्रांतीयांची नोंद ठेवावी अशी मागणी करतं असून तसा पत्रव्यवहार केला आहे.त्याप्रमाणे आपणही मध्यंतरी काळात अनेक पोलिस ठाण्यात नोंद ठेवण्यासंदर्भात सूचनाही केल्या होत्यां. परंतु सातत्या अभावी आजही अश्याप्रकारची नोंद होताना दिसत नाहीत.म्हणून स्थानिक लोकांच्या हक्कासाठी मागणी प्रमाणे कार्यवाही न झाल्यास आम्ही सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थांना सोबत घेवून आंदोलन करणार तर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा सुभेदार यांनी दिला. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी यां प्रकरणाची सखोल चौकशी करून तसे आढळून आल्यास संबंधित यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. यातील बराचसा विषय महसूल दफ्तरी येत असल्याने त्यांनी ही लक्ष देणे आवश्यक आहे पोलिस याबाबत योग्य तपास करतील असे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने महसूल विभागाला देखील निवेदन सादर करून चौकशी चीं मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी

स्वाभिमानी कामगार संघटनेचे तालुका समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार प्रकाश साटेलकर दोडामार्ग तालुका समन्वयक निलेश देसाई प्रवीण गवस आबा चिपकर संदेश सावंत सुनील नाईक तेजस चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!