कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥अवकाळीमुळे झालेल्या आंबा नुकसानीचे पंचनामे करा !

🟥ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली मागणी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.१४:-८ जानेवारी रोजी देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात पडलेल्या तुफान अवकाळी पावसामुळे संपूर्ण आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. या पावसाचा आंबा मोहोरावर आणि अंतिमतः आंबा पिकावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत म्हणून नुकत्याच पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.गेल्यावर्षी आंब्याचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले. आंबा व्यवसायावर अवलंबून असलेले अन्य व्यावसायीक देखील आर्थिकदृष्ट्यां पिछाडीवर गेले. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणावर येईल, अशी बागायतदारांची अपेक्षा होती. त्यामुळे बागायतदारांनी औषधे, कीटकनाशके, फवारणी, मजूर आदींवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. या मेहनतीला अपेक्षीत यश येण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे आंबा बागायतदार काहीसा सुखावला होता ८ जानेवारीलाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी पडले आहे. पावसामुळे आंबा मोहोर भिजून गेला आहे. त्यामुळे काही दिवसांत आंब्यावर बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता आहे. आंब्यावर डाग पडण्याचीही भीती आहे. आतापर्यंत केलेली लाखो रुपयांची गुंतवणूक अशी पाण्यात जाताना पाहून शेतकरी विदीर्ण झाला आहे. आंबा उत्पन्नावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था विसंबून आहे बागायतदार यांच्यासह मजूर, औषधे विक्रेते, वाहतूकदार, हमाल असे हजारो लोक आंब्यावर उपजीविका करीत असतात. कालचा पाऊस हा अशा हजारो लोकांसाठी नुकसानकारक आहे. या पावसामुळे आंबा उत्पादक मोठ्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा. राज्य सरकारशी संपर्क साधून तातडीच्या नुकसानभरपाईसाठी आग्रह धरावा आणि अडचणीतील आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना करीत असल्याचे श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!