राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..

▪️कु.आसिया सांगावकर, अक्षय सुतार व संजय गोरुले प्रथम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१९: २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिना”च्या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित व राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॕक वैभववाडी शाखा पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये पहिल्या ज्युनिअर गटातून प्रथम कु.आसिया सांगावकर, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे, तालुका सावंतवाडी, दुसऱ्या महाविद्यालय गटातून प्रथम कु.अक्षय सुतार,आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी तर तिसऱ्या खुल्या गटातून श्री. संजय गोरुले, कासार्डे तालुका कणकवली यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पहिल्या गटातून २५ निबंध, दुसऱ्या गटातून ७ निबंध तर तिसऱ्या गटातून २० निबंध मिळून एकूण ५२ स्पर्धकांनी  आपले निबंध सादर केले होते.

गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- पहिला गट-द्वितीय-दिक्षा दशरथ जाधव, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे, तृतीय-रिया रविंद्र कानडे, सेठ म.ग. हायस्कूल, देवगड, उत्तेजनार्थ-साहिल सचिन बाईत, शेठ म.ग.हायस्कुल देवगड व हर्षदा मंगेश वेंगुर्लेकर, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे, दुसऱ्या गटातून व्दितीय-विनया भगिरथ बागकर, देशभक्त शंकरराव गवाणकर काॕलेज सावंतवाडी, तृतीय-अंकिता अरुण गोरुले, सिनिअर काॕलेज कासार्डे, उत्तेजनार्थ-गौरी एकनाथ सावंत, गोगटे-वाळके काॕलेज बांदा व प्रणाली सुरेश पांचाळ, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी तर तिसऱ्या  गटातून व्दितीय-श्री. संजीव आत्माराम राऊत, जामसंडे-देवगड, तृतीय-कृतिका लिलाधर रेडकर, न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा, उत्तेजनार्थ प्रथमेश सुभाष पोळ, नाधवडे-वैभववाडी, व सोनाली सुरेश पांचाळ, आखवणे-वैभववाडी या तिन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय वैभववाडी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे याची संबंधित स्पर्धकांनी नोंद घ्यावी. तसेच मागील वर्षी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण याच कार्यक्रमात करण्यात येईल याची नोंद मागील वर्षीच्या विजेत्या स्पर्धकांनी घ्यावी, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, संघटक एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. एस.एन. पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!