सासोली हाणामारीप्रकरणी २४ जणांविरोधात गुन्हा*
*🟥सासोली हाणामारीप्रकरणी २४ जणांविरोधात गुन्हा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.१३*:सासोली येथील सामाईक जमिनीत सर्वेक्षण करण्याच्या कारणावरून स्थानिक ग्रामस्थ व एका कंपनीच्या कामगारांमध्ये गुरुवारी हाणामारी झाली. दोन्ही गटाने येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून दोन्ही गटातील २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकुर यांनी दिली. या प्रकाराची दखल घेत शुक्रवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांनी येथील पोलीस ठाण्याला भेट दिली.सासोली येथील द ओरिजीन कंपनीचे कर्मचारी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास तेथील कालव्याशेजारील सव्र्व्हे नं. १८० मध्ये सर्वेक्षण करत होते. त्यावेळी सासोली ग्रामस्थांनी राजेश श्रीराणूराम चौहान (५६, मूळ रा. गुडगाव, हरियाणा सध्या रा. मणेरी कलमठाणा ता. दोडामार्ग) यांना हाताने मारहाण करून मुका मार दिला. तसेच त्यांच्याकडील मशीन तोडून नुकसान केले. या झटापटीत राजेश चौहान यांची सोन्याची चेन तुटून गहाळ झाली आहे. चौहान यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित महेश ठाकुर, संदेश व इतर दहाजणांविरोधात भा. दं. वि. कलम १४१, १४३, १४७, १४९, ३४१, ३२३, ४२७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.दुसऱ्या तक्रारीनुसार सासोली येथे गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ओरिजन कंपनीच्या कामगारांनी विजय रामचंद्र ठाकुर (४९, रा. सासोली) यांच्या सामाईक जमिनीतील सर्व्हे नं. १८० मधील बाजूच्या कलमांचे नुकसान केले. यावेळी कामगारांना विचारणा केली असता त्यातील काहींनी विजय ठाकुर यांना धक्काबुक्की करून हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच त्यांच्यासोबत असलेले संतोष भिवा सावंत यांनादेखील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. झालेल्या या झटापटीत विजय ठाकुर यांची सोन्याची चेन तुटून गहाळ झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित राजेश चौहान, आनंद रेडकर (रा. दोडामार्ग) व अन्य दहा व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम १४१, १४३, १४७, १४९, ३२३, ४२७, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश मी क प्रदेश गोव्या आहे.ठाकुर यांनी दिली.
*डीवायएसपींनी दिली तंबी*
या घटनेनंतर डीवायएसपी संध्या गावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी हाणामारी झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. दोन्ही गटातील व्यक्तींना समज देत यापुढे असा कोणताही प्रकार घडू देऊ नका, अशी तंबी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
