जॉब फेअर रोजगार मेळावा नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*🟥जॉब फेअर रोजगार मेळावा नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*🟥जॉबकार्डचे होणार वाटप*
*विशाल परब यांच्या संकल्पनेतून १२ रोजी रोजगार मेळावा*
*१० हजारांहून अधिक युवक-युवतींना देणार रोजगार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१०*:सावंतवाडीत १२ जानेवारीला भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर या रोजगार मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी करावी तसेच थेट मेळाव्याच्या ठिकाणीही उपस्थित राहू शकतात. जवळपास १० हजाराहून अधिक युवक-युवतींना थेट कंपन्यात रोजगार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गोवा, मुंबई, पुण्यातील कंपन्याचा यात समावेश आहे, असे भाजप युवा मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना जॉबकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुढील सहा महिने संबंधितांच्या पात्रतेनुसार असलेल्या जॉबची माहिती त्यांना मोबाईलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात भव्य दिव्य असा सावंतवाडीत जॉब फेयर रोजगार मेळावा भरवण्यात येत आहे. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अजून दोन दिवस नोंदणीसाठी शिल्लक आहेत तसेच थेट रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीही सुशिक्षित बेरोजगार येऊ शकता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून १२ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदानावर हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी तब्बल शंभरहून अधिक कंपन्या हजर राहणार आहेत. यात टाटा मोटर्स, महिंद्रा, वेलनेस स्टार, आयसीआयसीआय बँक, अशा अनेक कंपन्यांसह पंचतारांकित हॉटेलचा समावेश आहे. दरम्यान, यावेळी त्या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ प्लेसमेंट लेटर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उर्वरित लोकांना जॉब कार्ड देण्यात येणार आहे. जास्तीत- जास्त उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

