कणकवलीकरियरसामाजिकसिंधुदुर्ग

विकास भवनातून ग्रंथालय व शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार; प्रा.महेंद्र नाटेकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१९: स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान या संस्थेने पेन्शनर्स आणि जेष्ठांशी संवाद साधत हितगुज केले. जेष्ठ व्यक्तींना भेडसावणारे प्रश्न समजावून घेतानाच त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचाही लाभ घेतला. जिल्ह्यातील पेन्शनर्स च्या हक्काचे ‘विकास भवन’ संस्थेने सर्वांच्या मदतीने बांधले आहे. या भवनातुन ग्रंथालय व शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं करणार असल्याची माहिती प्रा.महेंद्र नाटेकर यांनी यावेळी दिली.

“पेन्शनर्स डे” निमित्ताने ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ आणि ‘कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या पदाधिकाऱ्यांबरोबर ‘पेन्शनर्स आणि त्यांच्या समस्या व जेष्ठांशी हितगुज’ असा संवाद-चर्चा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित जेष्ठांचे स्त्री राजसत्ताच्या विश्वस्त प्रतीक्षा साटम यांनी पुष्प देऊन स्वागत केले व सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा देण्यात आल्या. पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर म्हणालेत, १९८२ रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमुर्ती श्री.चंद्रचुड यांच्या निर्णयामुळे पेन्शनर्सच्या हक्कांकडे व प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. बऱ्याच मागण्या ह्या तिथुन पुढे सुटण्यास मदत झाली, म्हणून तो दिवस ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.दादा कुडतरकर यांनी, जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १६% एवढी जेष्ठ मंडळी आहेत. त्यांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम मिळायला हवा. स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.जान्हवी सावंत यांनी ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ चे सर्व विश्वस्त व सभासद हे जेष्ठ आणि पेन्शनर्स च्या प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जे शक्य होईल ती फुल न फुलाची पाकळी मदत करणार आणि शासन स्तरावरही काही विषय सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही दिली.

पेन्शनर्स असोसिएयशन आणि जेष्ठांच्या संस्थां सोबत स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान संयुक्त उपक्रम भविष्यात राबवेल. आज अगदी अमेरिका व इतर देश आणि आपल्या भारतात केंद्र राज्य पातळीवर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर आपल्या विकासाच्या प्रश्नांवर सक्रिय आहेत. आपणही तशाच प्रकारे सक्रिय राहून आपल्या अनुभवाचा फायदा हा गाव, जिल्हा ते राज्य आणि देशाच्या विकासाठी देत राहावा. आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्यांच्या मागे सतत राहावे ही इच्छा या पेन्शनर्स डे च्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली. स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या सरचिटणीस सौ.लेखा मेस्त्री यांनी संस्थेची प्रतिनिधी म्हणून सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी व पाठपुराव्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असा शब्द देते असे सांगितले. सौ.सारिका तानावडे यांनी या निमित्ताने काव्य वाचन केले. श्री. पि. बी. पाटील, श्री.बी.आर.चव्हाण, श्री.विद्याधर जोशी, श्री.अनंत कदम, श्री.विश्वनाथ केरकर, श्री.अरुण गणपत्ये, स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या विश्वस्त सौ.प्रतीक्षा साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!