🟥 सावंतवाडी शिशुवाटिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा..
🟥 पोलीस दल ‘रेजिंग डे ‘ निमित्त पोलिस अधिकाऱ्यांचा मुलांशी संवाद..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि.०३:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार, सबनीसवाडा सावंतवाडी येथे बालवाडी शिशु गटातील २ ते ६ वयोगटातील मुला मुलींनी म. ज्योतिबा फुले आणि सावत्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. बडबडगीते, देश भक्तीपर गीते सादर करीत बालकांनी या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दल ‘रेजिंग डे ‘ निमित्त सावंतवाडी पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी आणि महीला अंमलदार यांनी उपस्थीती दर्शविली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिशुविहारच्या अध्यक्षा आणि संस्थापक डॉ. सोनल लेले यांनी स्वागत केले.
यावेळी शिशुविहारच्या मुला मुलींनी गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, जय शारदे माता गीत, बडबडगीते, देश भक्तीपर गीत हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या अशी विविध गीते सादर केली. अतिशय सुंदर वेशभूषा आणि सुंदर आवाजात गायलेली गीते यामुळे एक अनोखा उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलीस उपनिरिक्षक अमित गोते, आनंद यशवंते, महीला पोलीस हवालदार मागदेलिन अमलेडा, स्वरा वरक, महीला पोलीस कॉन्स्टेबल गौरी ताम्हणेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.लहान मुलांमध्ये देश भावना वाढीस लागेल व त्यांची सुरक्षिततेबाबत डायल ११२ प्रणालीची माहिती दिली. लहान मुलांकडून मिळणारा प्रतिसाद खूपच उत्तम होता. शिशु विहारातील शिक्षिका उर्मिला राणे, प्रांजळ टिळवे, मदतनीस प्रतिभा गवळी यांच्या सहकार्याने अगदी अल्पावधीत उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात झालेला हा कार्यक्रम अगदी अविस्मरणीय ठरला. अखेर डॉ. सोनल लेले यांनी आभार प्रदर्शन केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

