कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्यास आंदोलन !

🟥उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी संपर्क प्रमुख शैलेश परब यांचा इशारा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.०१: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे २०१८ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे पाणबुडी प्रकल्प मंजूर झाला. २०१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर हे अर्थराज्यमंत्री असताना बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता गुजरात येथे नेण्याचा घाट घातला जात असून तसे झाल्यास उबाठा शिवसेनेतर्फे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी दिला. निवती येथील मंजूर पाणबुडी प्रकल्प गुजरात येथे नेण्याचा घाट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी रविवारी येथील तालुका संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, बाळा गावडे, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, शहरप्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी उपतालुका प्रमुख आबा सावंत, हिमांशु परब उपस्थित होते.यावेळी परब म्हणाले की, निवती येथील पाणबुडी प्रकल्प गुजरात येथे पळविण्याचा घाट सुरू आहे. अन त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले जात आहे. निवती येथील पाणबुडी प्रकल्पामुळे येथील ५ हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प येथेच होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणबुडी प्रकल्प जर झाला नाही जिल्हयात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे, असे यावेळी शैलेश परब यांनी सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!