कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पुरस्कार जाहीर

*🟥 सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पुरस्कार जाहीर*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी:सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी,दि-३०:-*
जिल्हा पत्रकार संघामार्फत ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार जाहीर करण्यात आले आहेत नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये जेष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली मधून चंद्रशेखर तांबट, मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना ग्रामीण पत्रकार पुरस्कार, वैभववाडी मधून युवा पत्रकार पुरस्कार श्रीधर साळूंखे यांना तसेच उर्वरित उत्कृष्ट पत्रकार पुरस्स्कार सावंतवाडी मधून अवधूत पोईपकर , दोडामार्ग मधून गणपत डांगी, सिंधुदुर्गनगरी मधून नंदकुमार आयरे,वेगुर्ल्या मधून प्रथमेश गुरव,कुडाळ मधून प्रमोद म्हाडगूत , देवगड मधून दयानंद मांगले , यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार निवडीसाठी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनामध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पुरस्कार जाहीर केले. यावेळी जिल्हा संघाच्या सचिव देवयानी वरसकर,उपाध्यक्ष बाळ खडपकर,सहसचिव महेश रावराणे,राजन नाईक, महेश सरनाईक,संतोष राऊळ उपस्थित होते. दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो निमित्ताने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव केला जातो त्याप्रमाणे यावर्षीहि पुरस्कार निवडीसाठी तालुका संघ आणि मुख्यालय पत्रकार संघ यांच्याकडून पुरस्कारासाठी दोन पत्रकाराची शिफारस घेण्यात आली होती त्यामधून प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ६ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक व पत्रकार भावना मध्ये पाहिलाच पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात मान्यवराच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
या पत्रकार दिन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले ,रेल्वे पोलीस आयुक्त तथा सिंधुदुर्गचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिसवे उपस्थित राहणार आहेत तसेच उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती उमेश तोरसकर यांनी दिली व जिल्ह्यतील सर्व पत्रकारांनी ६ जानेवारीला पत्रकार दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. दरम्यान पत्रकाराच्या गुणवंत व प्रविण्याप्राप्त पाल्याचा सत्कार सभारभ २० फेब्रिवारीला करण्यात येणार आहे २० फेब्रुवारीला पत्रकार भावनाचा पहिला वर्धापण दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून त्यावेळी पत्रकाराचे स्नेहसम्मेलन व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमात मुलाचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!