कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे दोन गटात मारहाण*

*🟥पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे दोन गटात मारहाण*

*🟥पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी: बैठक घेऊन शांततेचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२९:* पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात एका मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या मारहाण प्रकरणात एन. सी. दाखल झाली आहे. यात एकजण किरकोळ जखमी झाला आहे. म्हापसेकर तिठा येथील श्री स्वामी समर्थ स्टोअर्सच्या बाजूच्या सलून समोर हा प्रकार घडला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहारुख इशाक अक्तार (२३), रा. पिंगुळी गोंधयाळे यांनी कुडाळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले
आहे, आपण सलून समोर सिगारेट ओढत थांबलो होतो. त्यावेळी हेमंत पिंगुळकर याने आपणास येथे सिगारेट ओढू नको. बाजूला जा, असे सांगितले. त्यानंतर त्याने रागाने तेथे असलेली लाकडी रिप आपल्या डोक्यावर मारली आणि जखमी केले. घटनेनंतर तेथील ग्रामस्थ तेथे आले आणि भांडण सोडविले. हेमंत पिंगुळकर, दीपक गावडे, उदय गावडे, रा. पिंगुळी यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ३३४, ३२३, ३५२, ५०४, ५०६, ३४ अन्वये तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर हेमंत गणपत पिंगुळकर (३८), रा. पिंगुळी-सराफदारवाडी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे,
आपण सलूनच्या बाहेर बाकड्यावर बसलो असता, तेथे शाहरुख इसार अक्तार (२०) व रियाज शेख है दोघे आले. शाहरुखला आपण तेथे सिगारेट ओढू नको. येथून लांब जा, असे सांगितले असता, त्याने राग धरून आपणास थापटाने पाठीवर, पोटावर मारहाण करून मला मुका मार दिला. या प्रकरणी पोलिसांनी एन. सी. दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून गुरुवारी हिंदू मुस्लीम बांधव, तंटामुक्ती समितीसह ग्रामस्थांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस आधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी शांततेचे आवाहन दोन्ही गटांना कैले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!