कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोली घाट रस्त्यातून निघतो सोन्याचा धूर..चार वर्षांत सोळा कोटी मंजूर

🟥 अधिकारी व ठेकेदार यांच्या खाबूगिरीमुळे घाट रस्त्याची दुरवस्था

🟥 आंबोली घाटात झालेल्या अपघातांना बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल व्हावेत

🟥 माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या भूमिकेमुळे बांधकाम अधिकारी अडचणीत

🎥 Kokan Live Breaking News

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी, दि-२९:- प्रति महाबळेश्वर समले जाणारे व पर्यटकांचे माहेर घर असलेले आंबोली,चौकुळ ही थंड हवेची ठिकाणे बांधकाम व पर्यटन तसेच वनविभाग यांच्या खाबूगिरीमुळे आंबोली घाट रस्ता अखेरची घटका मोजत आहे,तर हा घाट म्हणजे अधिकारी व ठेकेदार यांच्या साठी पैसे कमविण्याचे मशिन आहे,गेल्या पाच वर्षांत या घाटासाठी तब्बल चौदा कोटी रुपये मंजूर झाले असून या घाट रस्त्यातून सोन्याचा धूर निघत आहे.

सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या घाट रस्त्याबाबत उठाव केल्यावर या अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत, आंबोलीला प्रति महाबळेश्वर समले जाते, आंबोली,चौकुळ ही दोन्ही गावे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत,वर्षा काठी हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात,तेव्हा आमचे स्थानिक आमदार व सध्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी ही गावे दत्तक घेऊन विकास करण्याचा विडा उचलला मात्र पर्यटन दृष्ट्या या दोन्ही गावांचा विचार केल्यास विकास शून्य फक्त कागदी घोडे नाचवत अधिकारी व ठेकेदार यांचीच पोटे भरण्याचे काम झाले.

आंबोली मधील जी टाॅप टेन पर्यटन स्थळे आहेत त्या एकाही पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता नाही, महादेव गड,कावळेसाद, हिरण्यकेशी,याठीकाणच्या रस्त्यांची तर चाळण झाली आहे,व या रस्त्यावर एक गाडी जात असेल तर दुसरी गाडी सुटणार नाही अशी या रस्त्या़ची अवस्था मग विकास कोणाचा झाला? आंबोली पर्यटनावर अवलंबून असलेले व्यावसायिक तर मेटाकुटीला आलेत ज्यावेळी पर्यटन सीझन असतो नेमका त्याच वेळी दरड कोसळते बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात व पर्यटक घाबरून आंबोलीत येणेच टाळतात.. पावसाळ्यात पर्यटन जोरदार असते पण हाॅटेल मधील विद्यूत पुरवठा बंद असतो,प्रति महाबळेश्वर असलेल्या आंबोली,चौकुळीत एकदा लाईट गेली की ती दोन दिवस येणार नाही याची शंभर टक्के खात्री मग पर्यटक आंबोली कडे काय म्हणून वळणार,काय पायाभूत सुविधा पर्यटकांसाठी आंबोलीत उभ्या राहिल्यात ते सांगावे फक्त वेगवेगळ्या हेड खाली करोडा रूपये मंजूर करुन आणायचेत व अधिकारी व ठेकेदार यांची पोट भरायचीत एवढाच एक कलमी कार्यक्रम.

सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना स्वच्छ चारित्र्याचे व निष्कलंक नगराध्यक्ष म्हणून पाहिले जाते,ते सहसा कुठच्या विषयात पडत नाहीत व एखाद्या विषयात पडले की तडीस नेल्या शिवाय सोडत नाही असा त्यांचा स्वभाव,अनेट वेळा आम्ही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यां सोबत आंबोली, चौकुळ येथे गेल्यावर उघड्या डोळ्यांनी दिसत असलेल्या या भ्रष्टाचारावर चर्चा होते व ती चर्चा तिथेच थांबते यावेळी मात्र तसे घडले नाही आपल्या डोळ्यासमोर होत असलेला हा भ्रष्टाचार बबन साळगावकर यांना पाहवला नाही,त्यांनी घाट रस्त्याबाबत जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली व तशी तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली.

या तक्रारीच्या निमित्ताने मला एक आठवण झाली, बऱ्याच वर्षा पूर्वी कुडाळ पोलीस ठाण्यात साळुंखे नावाचे पोलीस निरीक्षक होते,त्यांनी कुडाळातील एका रस्त्यावर खड्ढा पडल्याने अपघात होऊन एकाला प्राण गमवावे लागले होते,त्यावेळी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.तशीच हिम्मत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दाखवावी असे आमचे त्यांन आवाहन आहे,कारन घाटातील या रस्त्यांमुळे अनेक अपघात होऊन काही जणांना आपले प्राण गमवावे लागले तर काही जण कायमचे जायबंदी झालेत.

गेल्या पाच वर्षांत सोळा कोटी रुपये खर्च झालेत असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असेल तर तो हास्यास्पद प्रकार आहे, गेल्या चार वर्षांत या रस्त्यावर एवढे पैसे खर्च झाले असते तर अशी आंदोलने करण्याची वेळ कधीच आली नसती. तत्कालीन अधिकारी सौ अनामिका चव्हाण यांनी काही मर्जीतील ठेकेदारांना घेऊन जो धूडगूस घातला त्याची फळे नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना भोगावी लागत आहेत.हम करे सो कायदा अशा अर्विभावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आज आंबोली घाटाची अवस्था दयनीय झाली याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन अधिकारी आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची खाते निहाय चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी व या रस्त्यावर जेवढे अपघात झाले त्या सर्व अपघातांना त्या अधिकाऱ्यांना व ठेकेदराला कारणीभूत ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी रास्त मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे व त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!