कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित “वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन” कृषी महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२७:- वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन २०२४ ” कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्यासह चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या महोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून या महोत्सवाचे कोकणवासीयांना आकर्षण असणार आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तर आता

रोजगाराची संधी खुली करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांना दूध चळवळीत सक्रिय करण्याचे ठरवले आणि त्यातूनच मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आली.

कोकणात या अगोदर काही लोकांनी दुग्धप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु विविध कारणांमुळे हे प्रकल्प अल्पावधीतच बंद पडले. कोकणात दुग्धप्रकल्प यशस्वी होत नाही, अशीच मानसिकता झालेली. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसारखे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, असे स्वप्न चव्हाण साहेबांनी पाहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत.

मात्र, आता एवढ्यावरच न थांबता दुग्ध व्यवसायाबरोबरच येथील शेतकरी आर्थिकदृष्टीने सक्षम झाला पाहिजे. शेतकऱ्यांना रोजगाराच्या वाटा निर्माण होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत असणार आहे.

या कृषी प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल.

चर्चासत्रासाठी विशेष कक्ष असणार आहे. तर पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन, प्री फॅब्रिकेटेड स्ट्रॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, तसेच महिला बचत गटांकरिता ५० स्टॉल मोफत असणार आहेत. या कृषी महोत्सवाला मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. पिलरलेस दोन शामियान, परदेशी भाजीपाला, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील असणार आहेत. तसेच उत्कृष्ट पशुधन व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्टी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका ऍड. नयना पवार, पत्रकार समीर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी चिपळूण नागरीचे संचालक सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुढेकर, संदीप पाटील, गणेश कदम, कु. स्वामिनी यादव, श्री. मगदूम, रमण डांगे, डीडायनॅमिकचे नरेंद्र अहिरे, प्रशांत उतेकर, पत्रकार संतोष सावर्डेकर आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!