देवी अनुसया माता यांचे देहावसान
*🟥देवी अनुसया माता यांचे देहावसान*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२७:* प. पू फलाहारी महाराज यांच्या शिष्या देवी अनुसया माता (६२) यांचे रविवारी सायंकाळी देहावसान झाले. शहरातील विश्रांतीधाम आश्रमामध्ये त्या वास्तव्यास होत्या. वयाच्या सहाव्या वर्षापासून फलाहारी महाराज यांच्या त्या शिष्या होत्या. अनुसया माता यांचे पार्थिव सोमवारी विश्रांतीधाम आश्रमामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाचे विविध क्षेत्रातील मंडळींसह अनुयायांनी दर्शन घेतले. अनुसया माता या शहरातील निम्मेवाडीच्या रहिवासी होत्या. त्यांची बालपणापासून देवावर श्रद्धा होती. त्यामुळे संसारात अडकून न राहता त्या सातत्याने धार्मिक कार्याकडे वळल्या. त्यानंतर देवदेवतांची पूजाआर्चा करतानाच प. पू फलाहारी महाराज यांच्या त्या भक्त बनल्या. अढळ श्रद्धेतून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत महाराजांची सेवा केली. महाराजांचे पुणे येथे प्रस्थान झाल्यानंतर त्यांनी अनुयायांना सोबत घेऊन प्रशस्त विश्रांतीधाम स्थापन केला. या विश्रांतीधामध्ये गणेश मंदिर उभारणी व फलाहारी महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली. या विश्रांतीधाममध्ये नेहमीच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. प. पू. फलाहारी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त व आश्रमात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. या कार्यक्रमांध्ये त्या सेवादेखील बजावत होत्या. अक्षय तृतीयेनिमित्त आश्रमात पाच दिवस पार पडणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. फलाहारी महाराज यांच्या आश्रमात गणेश मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. *अंत्यदर्शनासाठी अनुयायांची गर्दी* कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्हयात त्यांना मानणारे अनेक अनुयायी आहेत. त्यांच्या देहावसानाचे वृत्त कळताच अंतिम दर्शनासाठी आश्रमस्थळी अनुयायांनी गर्दी केली होती. अनुसया माता ज्या ठिकाणी तपश्चर्या करायच्या, त्या ठिकाणी त्यांना समाधी दिली जाणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
