निरवडे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला रुग्णाचा जीव…
सावंतवाडी, दि.२६:- निरवडे येथे लग्नाच्या निमित्ताने इन्सुली येथील मूळ व सध्या मुंबई येथे राहत असलेले शिवा परब व्यक्ती हे आले होते अचानक दुपारी त्याना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे ते आपल्या भावाला घेऊन जवळच असलेल्या आरोग्य केंद्रात गेले. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले निरवडे आरोग्य केंद्राचे डॉ. विक्रम मस्के आणि डॉ. संजीवनी लंबे यांनी त्या रुग्णाची स्थिती पाहून लगेच ईसिजी काढण्यास घेतला त्यात त्यांना समजले की रुग्णाला गंभीर हृदयविकाराचा धक्का आला आहे. ह्यामुळे त्या परब नामक रुग्णाचे हृदय व नाडी बंद होत असल्याचे निदर्शनास आले असता डॉ. विक्रम मस्के आणि डॉ. संजीवनी लंबे यांनी रुग्णाला सी.पी. आर. ही सेवा देण्यास सुरुवात केली आणि डॉक्टरांनी स्वतःसिपीआर देत रुग्णाच्या नातेवाईकाशी चर्चा करुन त्या रुग्णाला नजीकच्या उपचारासाठी अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयात दाखल केले.त्या ठिकाणी त्या रुग्णावर उपचार सुरु आहेत.
डॉ. विक्रम मस्के आणि डॉ. संजीवनी लंबे यांनी वेळीच केलेल्या उपचारामुळे त्या रुग्णाचा जीव वाचला असून नातेवाईकांनी देखील त्या डॉक्टरांचे आभार मानले.

