प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी
सिंधुदुर्गगरी
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. शेतकऱ्यांचा स्वत:च्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे समंतीपत्र आवश्यक राहील. जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे समंत्तीपत्र आवश्यक राहील. ३१ डिसेंबरपर्यंत महाडिबीटावर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती, महिला व दिव्यांग यांची निवड लॉटरी पद्धतीने होणार आहे.
योजनेचा लाभ सर्व पिकासाठी घेता घेईल. सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणी
देणे ही कामे ८० टक्के अनुदानित आहेत. या योजनेकरिता लाभ क्षेत्र मर्यादा किमान ०.१० हे. ते कमाल ५.०० हे. क्षेत्र इतकी आहे. अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणी करुण सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी. आपला आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तथापि ही प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (प्रति थेंब अधिक पीक) सुक्ष्म सिंचन या बाबीकरिता www. mahadbtmahait.gov. या संकेतस्थळावर अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

