मोती तलावात मद्यपी पडला ;मात्र सुखरूप काढले बाहेर
सावंतवाडी शहरात सायंकाळी ७ च्या सुमारास मोती तलावात एक मद्यपी पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्वरित नगरपालिकेचे कर्मचारी दाखल होत त्याला सुखरूप बाहेर काढले.
मद्यपी चे नाव प्रवीण ओटवणेकर असुन हा जगन्नाथ भोसले उद्यान समोर तलावाच्या कठडयावर बसला होता मात्र तो दारू च्या नशेत असल्याने त्याचा तोल गेल्याने तो तलावात पडला असा अंदाज वर्तवण्यात आला.
नगरपालिकेचे कर्मचारी मयूर कांबळे संजय कदम समीर कदम ह्यांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले.

