कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

पाट येथे २५ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

पाट येथे २५ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

म्हापण

पाट देसाईवाडा येथील श्री देव दत्त देवस्थान आयोजित श्री दत्त मंदिर, देसाई वाडी, गांधीनगर, पाट येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भजन, कीर्तन, पालखी इत्यादी धार्मिक विधी होणार आहेत. यावर्षी २५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त देवस्थानच्या रंगमंचावर रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. नृत्य सादर करण्याची वेळ ३ मिनिटे असून ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. पहिला गट वय-६ ते ११ वर्षे, दुसरा गट-१२ ते १७ वर्षे, तिसरा गट-१८ वर्षांवरील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना ५०००, ३०००, १००० रुपये देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणी सुधीर प्रभू- देसाई, मोबाईल-९४२१२६०८१५ व सौ. ज्योत्स्ना सामंत यांच्याकडे २३ डिसेंबरपूर्वी करावी; असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!