मुंबईकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्यांची संख्या वाढवावी!
*🟥 मुंबईकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्यांची संख्या वाढवावी!*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-२०:-* जिल्ह्यातून मुंबईत जाणाऱ्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी बससाठी भरमसाट तिकीट मोजावे लागत आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने मुंबईत जा-ये करणाऱ्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत उर्फ भाई चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात सध्या ३० शयनकक्ष असलेल्या दोन गाड्या बांदा-बोरिवली चिपळूणमार्गे आणि बांदा-मुंबई- कोल्हापूर- पुणेमार्गे जा-ये करीत आहेत. मात्र, या दोन्हीही गाड्या आगावू आरक्षणाद्वारे पूर्ण क्षमतेने धावत असतात. त्यामुळे जिल्हयातील प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करता येत नाही. सकाळची मालवण-मुंबई फेरी प्रवाशांच्यादृष्टीने गैरसोयीची ठरते. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेले आणि अचानकपणे मुंबईत जावे लागणारे प्रवासी शक्यतो रातराणी गाड्यांतून प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, सायंकाळच्या सत्रात उपरोक्त ३ गाड्यांव्यतिरिक्त मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या गाड्याच नाहीत. शासनाच्या सवलतीमुळे विविध तिकीट प्रवाशांचा कल एसटीकडे वळला आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी वाढीच्यादृष्टीने आणि सवलतीप्राप्त प्रवाशांच्या सोयीसाठी दोडामार्ग-कणकवली- मुंबई, शिरोडा-वेंगुर्ले-मुंबई, मालवण-कणकवली-मुंबई अशा फेऱ्या सुरू कराव्यात. यापैकी काही गाड्या ठाणे, कल्याण, बोरिवली आदी ठिकाणी सोडाव्यात. शयनकक्ष गाडीचे तिकीट जास्त असल्याने त्याऐवजी साध्या, हिरकणी माड्या सोडाव्यात, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

