तिघांना मारहाणप्रकरणी वागदेतील दोघांवर गुन्हा
*🟥तिघांना मारहाणप्रकरणी वागदेतील दोघांवर गुन्हा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२०:* बागदे – मांगरवाडी येथील राजेंद्र प्रभाकर – परब (४९), त्यांचा मुलगा शुभम व वागदे येथीलच अनंत गोसावी अशा तिघांना मारहाण केल्याप्रकरणी वागदे येथीलच किशोर घाडीगावकर व मंगेश घाडीगावकर या दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वागदे येथेच सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे राजेंद्र यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, राजेंद्र हे सेंटिंग कामासाठी प्लेटस् भाड्याने देतात. त्यांनी संशयितांना भाड्याने प्लेटस् दिल्या होत्या. त्याचे १ लाख ७ हजार रुपये येणे आहेत. सदरचे पैसे मागण्यासाठी राजेंद्र मुलगा शुभम याच्यासह संशयितांकडे गेले. संशयितांनी राजेंद्र यांना शिविगाळ केली व ‘आमचे काय ते करून घे.’ अशी धमकी दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, राजेंद्र यांचा मुलमा शुभम याने संशयितांना शिविगाळ करू नको’ असे म्हटले. त्याचा राग येऊन संशयितांपैकी एकाने राजेंद्र यांना पकडले व दुसऱ्याने थापटाने मारहाण केली. याचवेळी त्याने राजेंद्र यांच्या ओठानजीक चावाही घेतला. तर तेथे भांडण सोडविण्यास आलेल्या अनंत गोसावी यांच्या पायावर किशोर याने लाकडी दांड्याने मारहाण केली. दरम्यान राजेंद्र यांना दुखापत झाल्यने मुलगा शुभम त्यांना डॉक्टरकडे घेऊन जात होता. त्याचवेळी तेथे पुन्हा दाखल मंगेश घाडीगावकर याने परत आलास तर हात पाय मोडून ठेवेन अशी धमकी दिली. गंभीर जखमी राजेंद्र यांच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

