प.पु. भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव आजपासुन सुरू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१७: येथील योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास आज गुरुवार दि. १७ डिसेंबर २०२० पासुन भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाची समाप्ती सोमवार दि. २१ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पं.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी फुलांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी बाबांचा उत्सव हा शहरातील भक्तांसाठी आनंदाची आणि भक्तीची पर्वणीच असते. मात्र, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अगदी साधेपणाने संस्थानच्या व ब्रम्हवृदांच्या काही मोजक्याच उपस्थितीत धार्मिक विधीस प्रारंभ करण्यात आला.
गुरुवारी पहाटे समाधीपुजन, काकड आरती तसेच सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान या धार्मिक विधीस ब्रम्हवृदांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी भालचंद्र संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर, सदस्य प्रसाद अंधारी, अँड. प्रवीण पारकर, व्यापारी विजय पारकर, व्यवस्थापक विजय केळुसकर, बाळा सापळे, श्रीरंग पारगावकर आदी उपस्थित होते.
दुपारी आरती, सुश्राव्य भजने आदी कार्यक्रम झाले. यावेळी भक्तांनीही अंतर पाळत कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळत दर्शन घेतले. पुढील ४ दिवस विधी व दैनंदिन कार्यक्रम सुरु राहणार असुन, भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्वभुमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*
*🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*
*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)
💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..
💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..
🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*
🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

