भाजपचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शफीक खान यांची भाजपला सोडचिठ्ठी..
▪️ जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴 सावंतवाडी,दि.१७: भाजपचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शफीक खान यांनी राष्ट्रवादीच्या विचारांवर प्रेरित होऊन आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, अर्चना घारे यांनी शफीक खान यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,चित्रा बाबर देसाई, सचिन पाटकर ,सत्यजित धारणकर, सुरेश गवस, काका कुडाळकर हिदायतुल्ला खान, बाळा कनयाळकर,आशिष कदम, नवल साटेलकर, शिवाजी घोगले, अशोक कांदे, जावेद शेख,अनंत पिळणकर, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

