कणकवलीकोकणमहाराष्ट्र

धक्काबुक्की केल्याप्रकरणी पिता – पुत्रावर गुन्हा

*🟥धक्काबुक्की केल्याप्रकरणी पिता – पुत्रावर गुन्हा*

*🟥परस्परविरोधी तक्रारीनुसारही अदखलपात्र गुन्हा दाखल*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१८:* दुकानाच्या भिंतीला आपल्या लोखंडी चॅनल ठोकला व छपराची लाकडी सर कापल्याबाबत विचारणा करणाऱ्या नामानंद महादेव मोडक (५८, कणकवली पटकीदेवी मंदिरानजीक) यांना धक्काबुक्की, शिविगाळ व धमकी दिल्याबाबत तेथीलच लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण व त्याचा मुलगा रविकांत लक्ष्मीकांत चव्हाण यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वा. सुमारास घडल्याचे मोडक यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण यांनीही दिलेल्या तक्रारीनुसार नामानंद मोडक याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, मोडक यांच्या राहत्या घराच्या पडवीत व आतील खोलीत पेंटिंग व्यवसायाचे दुकान आहे. बाजूलाच लक्ष्मीकांत चव्हाण राहत असून तेथेच त्याचे सलून आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास लक्ष्मीकांत हा सलूनच्या छप्परदुरुस्तीचे काम करत होता. ११ वा. सुमारास मोडक यांना आपल्या दुकानाच्या छपराजवळ काही ठोकल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता लक्ष्मीकांत याच्या कामगारांनी मोडक यांच्या दुकानाच्या भिंतीला लोखंडी चॅनल ठोकले होते व दुकानाच्या छपराची सर कापली होती. याबाबत मोडक यांनी विचारणा केली असता लक्ष्मीकांत व त्याचा मुलगा रविकांत यांनी मोडक यांना शिविगाळ केली. रविकांत याने मोडक यांना शर्टाला धरून ढकलले. मोडक दुकानाच्या खोलीत गेले असता संशयितांनी तेथे येऊन ‘परत आलात तर तुम्हाला कोयता, कुन्हाडीने मारून टाकू अशी धमकी दिल्याचे मोडक यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान घटनेबाबत लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण (५७, कणकवली पटकीदेवी मंदिरानजीक) यांनीही तक्रार दिली आहे. त्यानुसार नामानंद मोडक याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!